दोषींची गय करू नका; मुख्यमंत्री केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - दिल्लीतील दंगलप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांचा पक्ष, पद आदींची पर्वा न करता कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज व्यक्त केली. पश्चिम दिल्लीत अफवांचा बाजार रोखण्यासाठी रविवारी विलक्षण वेगाने काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी दंगलीच्या काळात इतकी तत्परता दाखविली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे सांगून केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या निष्क्रियतेकडेही अंगुलिनिर्देश केला.

जीवघेण्या कोरोना विषाणूने दिल्लीतही शिरकाव केल्याचे आढळल्याने त्याच्या मुकाबल्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून काम करतील असेही त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर केजरीवाल यांनी मोदींची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

अलीकडेच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.  पत्रकारांशी बोलताना त्यांनी, पंतप्रधानांबरोबरची ही भेट एक राजशिष्टाचार होता असे सांगितले. यावेळी खासदार संजय सिंह, भगवंत मान आदी उपस्थित होते.

तत्परता दाखविली असती तर...
केजरीवाल म्हणाले की, ‘‘ दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तेथे असे दंगेधोपे व्हायला नकोत; पण झालेल्या दंगलीस जे कोणी जबाबदार असतील, मग ते कोणत्याही पक्षाचे, धर्माचे असोत किंवा तो कितीही मोठा माणूस असो, त्यांना दयामाया दाखविता कामा नये. यासाठी राज्य सरकार म्हणून जे काही उपाय करायचे ते आम्ही करू. या दंगेखोरांवर कठोर कारवाई झाली तरच अशाप्रकारचे कृत्य कोणी करणार नाही  भविष्यात अशा अप्रिय घटना दिल्लीत होऊ नयेत यासाठी दिल्ली सरकार केंद्राबरोबर काम करेल.पश्चिम दिल्लीत रविवारी जो अफवांचा बाजार गरम होता त्याचा निपटारा करण्यात जी विलक्षण तत्परता व जागरूकता पोलिसांनी दाखविली ती दंगल भडकलेल्या भागांत २३ व २४ फेब्रुवारीला पोलिस दाखविते तर मोठी जीवितहानी टळली असती.’’ दरम्यान पंतप्रधानांबरोबर आपण करोना विषाणूच्या दिल्लीतील प्रसाराबाबतही चर्चा केली असे सांगून केजरीवाल म्हणाले की, करोनाचा पहिला रूग्ण आढळल्यावर दिल्लीतही आम्ही करोनाला अटकाव करण्यासाठी केंद्राबरोबर मिळून काम करणार आहोत.

पोलिसावर बंदूक रोखणारा शाहरुख अटकेत
राजधानीतील हिंसाचारादरम्यान थेट पोलिस अधिकाऱ्यावर बंदूक रोखणारा माथेफिरू तरुण शाहरुख याला उत्तर प्रदेशातील मौजपूर येथून आज अटक करण्यात आली. शाहरुखला लवकरच दिल्लीमध्ये आणण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मागील आठवड्यामध्ये शाहरुखचे काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते यात तो एका पोलिस अधिकाऱ्यावर बंदूक रोखत धमकावत असल्याचे दिसून येते.

भारताने खडसावले
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांसाठीच्या उच्चायुक्तांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या संदर्भातील माहिती जीनिव्हातील भारताच्या स्थायी प्रतिनिधींना कळविली होती. खुद्द परराष्ट्र मंत्रालयाकडूनच तशी माहिती देण्यात आली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने मात्र नागरिकत्व कायदा हा आमचा अंतर्गत मुद्दा असून, या संदर्भात कायदा तयार करण्याचा सार्वभौम हक्क हा भारतीय संसदेला असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. नागरिकत्व कायदा हा घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याची भारताची ठाम भूमिका आहे , असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com