'लोकांच्या आयुष्याशी खेळू नका'; मोदींच्या रामदेव बाबांना कानपिचक्या

'लोकांच्या आयुष्याशी खेळू नका'; मोदींच्या रामदेव बाबांना कानपिचक्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पाच वाजता देशवासीयांना संबोधित केलं. या संबोधनात मोदी काय घोषणा करतील, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. नरेंद्री मोदी यांनी या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदींनी लसीकरणासंदर्भातच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याशिवाय त्यांनी लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा आणणारे अनेक घटक दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. सोबतच त्यांनी लसीकरणासंदर्भात गैरसमज पसरवणाऱ्यांना देखील इशारा दिला आहे. PM मोदींनी रामदेव बाबांचं नाव न घेता त्यांनाच एकप्रकारे हा इशारा दिला आहे. (Dont play with people lives PM modi says indirectly to Ramdev Baba)

'लोकांच्या आयुष्याशी खेळू नका'; मोदींच्या रामदेव बाबांना कानपिचक्या
लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्राकडे; PM मोदींची घोषणा

मोदींनी म्हटलंय की, एकीकडे कोरोनाची दुसरी लाट थैमान माजवत आहे तर दुसरीकडे अनेक लोकांकडून भ्रम पसरवल्याचं पाहून चिंता वाटतेय. लस निर्मितीची प्रक्रिया सुरु असतानाच लसीविषयी भीती आणि चिंता वाढवणाऱ्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. लस घेतली जाऊ नये, यासाठी देखील काही लोकांकडून प्रयत्न केले गेले. जे लोक हे काम करत आहेत, ते लोक भोळ्या भाबड्या लोकांच्या आयुष्याशी खेळत असून यांच्यापासून सावध रहा. मी सर्वांना विनंती करतो, की आपण लसीबाबत जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.

'लोकांच्या आयुष्याशी खेळू नका'; मोदींच्या रामदेव बाबांना कानपिचक्या
आम्ही लसीकरणाचं कवरेज ६० वरुन ९० टक्क्यावर नेलं - पंतप्रधान

योगगुरु रामदेव बाबा हे अलिकडेच ऍलोपॅथीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत होते. रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं की, लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही 10 हजारहून अधिक डॉक्टर्स आणि लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. ऍलोपॅथी उपयोगी नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन आक्रमक झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवून पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितलं होतं. तसेच असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) एक पत्र लिहलं होतं. या पत्रात IMA ने म्हटलं होतं की, पतंजलीचे मालक रामदेव यांच्याकडून लसीरकरणासंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला तातडीने थांबवण्यात यावं.

IMA ने म्हटलं होतं की एका व्हिडीओमध्ये रामदेव बाबांनी दावा केलाय की लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही 10 हजारहून अधिक डॉक्टर्स आणि लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. IMA ने रामदेव बाबांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधी अलॉपॅथी ट्रिटमेंटवरुन रामदेव बाबांच्या वतीने विचारण्यात आलेल्या 25 प्रश्नानंतर IMA उत्तराखंडने त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस जारी केली होती. IMA ने म्हटलं होतं की, रामदेव बाबांना अलॉपॅथीमधील 'ए' देखील माहिती नाहीये. आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत, मात्र सर्वांत आधी त्यांनी आपली योग्यता सांगावी. जर रामदेव बाबांनी येत्या 15 दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com