बच्चनजी, गुजराती गाढवांचा प्रचार नका करू- अखिलेश

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

गुजरातमधील कच्छच्या रणात असलेल्या भारतीय जंगली गाढवांच्या अभयारण्याची जाहिरात अमिताभ बच्चन करीत आहेत. ही गुजरात पर्यटन विभागाची एक मिनिटाची जाहिरात आहे. 

नवी दिल्ली- 'शतकातील महानायकाला मी आवाहन करतो की, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नका,' असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. 

अखिलेश यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविणारे असल्याने त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधानामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या राजकीय खडाजंगीमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन हेही ओढले गेले आहेत. अमिताभ हे गुजरात पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, तर त्यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. 

गुजरातमधील कच्छच्या रणात असलेल्या भारतीय जंगली गाढवांच्या अभयारण्याची जाहिरात अमिताभ बच्चन करीत आहेत. ही गुजरात पर्यटन विभागाची एक मिनिटाची जाहिरात आहे. 
अखिलेश यांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले, "अखिलेश यादव यांचा तोल गेला आहे. हे विधान म्हणजे वैयक्तिक हल्ला असून त्यांची अस्वस्थता त्यातून दिसते. मुख्यंमत्र्यांनी मारलेला हा अत्यंत हलक्या दर्जाचा आणि मानहानिकारक शेरा आहे."
 

Web Title: don't promote donkeys of Gujarat, says akhilesh to amitabh bachchan