शिक्षणापासून हात झटकू नका; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

Delhi-High-Court
Delhi-High-Court

नवी दिल्ली - केंद्र सरकार हे शिक्षण क्षेत्रापासून हात झटकू शकत नाही, तसेच त्याच्या वित्तपुरवठ्यापासूनही दूर राहू शकत नाही, असे खडे बोल आज दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

विद्यापीठाच्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील आठवडाभराच्या काळामध्ये ही औपचारिकता पूर्ण करावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना शुल्कवाढीच्या आधीच्या रचनेनुसार शुल्क भरण्याची परवानगी द्या, असे आदेशही न्या. राजीव शाकधर यांनी विद्यापीठाला दिले आहेत. विद्यार्थी संघटनेची प्रमुख आईशी घोष आणि अन्य नेत्यांनी शुल्कवाढ आणि हॉस्टेल मॅन्यूअलमधील सुधारणेस न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल पिंकी आनंद यांनी विद्यार्थी संघटनेच्या याचिकेस विरोध केला. विद्यापीठातील नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीस पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला; पण त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. शिक्षणासाठी सरकारला वेगळा निधी द्यावा लागतो. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा बोजा हा विद्यार्थ्यांवर टाकता येत नाही. कुणाला तरी निधीची सोय करावीच लागेल असे न्या. शाकधर यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com