तुमच्यासोबतही हेच होणार; विमानतळावर रोखल्यानंतर अखिलेशचा इशारा

तुमच्यासोबतही हेच होणार; विमानतळावर रोखल्यानंतर अखिलेशचा इशारा

लखनौ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावर रोखण्यात आल्याने उत्तरप्रेदशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव हे प्रयागराजला जाण्यासाठी अमोसी विमानतळावर आले होते. पण प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. यावर अखिलेश यादव यांनी तुमच्यासोबतही हेच होईल हे लक्षात ठेवा असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे.
 

अखिलेश यादव यांना अलाहाबादला जाण्यापासून विमानतळावरच रोखण्याच्या प्रकारामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा निंदनीय प्रकार असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. ही भाजपा सरकारची हुकूमशाही असून लोकशाहीच्या हत्येचे प्रतीक असल्याचा आरोप असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मायावती म्हणाल्या की, भाजपाचे केंद्र व राज्य सरकार सप-बसप आघाडीला इतके घाबरले आहेत की त्यांनी आमच्या राजकीय हालचाली व पक्षाच्या कार्यक्रमच रोखणे सुरू केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरीकडे भाजपने अखिलेश यादव यांच्यावरच टीका केली आहे. शांततेने कुंभ मेळा सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये सध्या चांगले वातावरण नाही. काही गडबड होऊ नये यासाठी त्यांना रोखण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना कुंभ मेळ्यात विघ्न आणायचे असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com