जीपमध्ये रक्त सांडू नये म्हणून पोलिसाने नाकारली मदत

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

सहारनपूर (उत्तर प्रदेश) - आपघातामध्ये जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना (गुरुवार) पालिसांनी, रक्ताने गाडी खराब होण्याच्या कारणावरुन मदत नाकारल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे संतापाचे वातावरण आहे.

एका रस्ते अपघातामध्ये जखमी झालेली ही दोन अल्पवयीन मुले पोलिसांसमोर रस्त्यावर तडफडून मेली तरी पोलिसांनी काहीच केले नाही. उपस्थित लोकांनी पोलिसांना विनंती करुनही त्यांनी कोणतीच मदत केली नाही. तसेच आपल्या गाडीतून या मुलांना रुग्णालयात नेण्यास देखील पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या गाडीने या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, या मुलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. 

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ उपस्थितांनी तयार रेकॉर्ड केला असून, हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

शहर पोलिस अधिक्षक प्रबळ प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

Web Title: "Don't Want Blood Stains In Car": 2 Teens Die As UP Cops Refuse Help