Atal Bihari Vajpayee : निधनाच्या वृत्ताबद्दल दूरदर्शनची माफी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. 

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, दूरदर्शनने अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनासंदर्भातील वृत प्रसिद्ध केले होते. दूरदर्शनने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनीही त्यासंदर्भात बातम्या दिल्या. त्यानंतर याप्रकाराबाबत दूरदर्शनने अखेर माफी मागितली.

प्रकृती खालावल्याने मागील नऊ आठवड्यांपासून वाजपेयींना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. मात्र, दूरदर्शनने अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनासंदर्भातील वृत्त प्रसारित केले होते. दूरदर्शनने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर माफी मागितली. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.  

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. 

Web Title: Doordarshan Apology for Vajpayee News