हुंडाबंदीच्या काळातही तुमची ठरतेय किंमत 

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

नवी दिल्ली - भारतात हुंडा बंदी असताना हुंडाबळी जाऊ नयेत यासाठी जनजागृती केली जात आहे. तरीही हुंडा किती मिळाला हवा हे सांगणारी एक वेबसाईट प्रकाशात आली आहे. एका वेबसाईटवर विवाहास इच्छुक असणाऱ्या मुलाची आणि त्याच्या वडिलांची माहिती भरल्यानंतर त्यानुसार त्याने मुलीच्या घरच्यांकडे किती हुंडा मागायला हवा हे सांगितले जाते. ही वेबसाईट गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. मात्र, सध्या ती प्रकाशात आली आहे. 

या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी आता पुढे येत आहे. या वेबसाईटवर नवऱ्या मुलाचे वय, उंची, रंग विचारण्यात येतो त्याचबरोबर तो करत असलेली नोकरी, जात, कमाई अशा बाबी भराव्या लागतात. त्याचबरोबर त्यामध्ये याबाबत पर्यायही दिलेले आहेत. त्यानंतर, त्याचे वडील काय करतात हे देखील स्पष्ट करायचे आहे. ही सगळी माहिती भरल्यावर या मुलाने किती हुंडा मागावा याचा अंदाज या वेबसाईटवर देण्यात येतो.

ही वेबसाईट म्हणजे एक लाजीरवाणी बाब आहे. सध्या देशात हुंडाबळीबाबत मोठी मोहीम राबवली जात असताना अशा प्रकारची संकेतस्थळे हुंड्यासाठी खतपाणी घालताना दिसतात. यावर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Web Title: dowrycalculator website in dowry banned time

टॅग्स