डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी; नरेंद्र मोदी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
Dr babasaheb Ambedkar thoughts inspiring narendra Modi
Dr babasaheb Ambedkar thoughts inspiring narendra Modisakal media

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. डॉ. आंबेडकर यांचे दलितांच्या आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणाचे विचारच आपल्या सरकारची प्रेरणा आहे, असे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले. डॉ. आंबेडकर यांनी देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिले असेही ते म्हणाले. पंतप्रधानांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला आदींनी संसदेच्या आवारातील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की देशातील गरिबांचे हित लक्षात ठेवून आमचे सरकार योजनांची अंमलबजावणी करत आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात सरकारने अनेक मापदंड प्रस्थापित केले आहेत. मोदींनी डॉ.आंबेडकरांना ट्विटरवरूनही आदरांजली वाहिली. ‘डॉ.आंबेडकरांना जयंतीनिमित्त आदरांजली. आजचा दिवस त्यांनी देशासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आहे,’ असे ट्विट त्यांनी केले.

महावीर जयंतीच्या शुभेच्छा

जैन धर्मातील २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तही पंतप्रधानांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. ‘सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा. आज भगवान महावीर यांच्या विशेषत: शांती, करूणा आणि बंधुत्वावर भर देणाऱ्या शिकवणुकीचे आज स्मरण होते.’ असे ट्विट मोदींनी केले. तमीळ नववर्ष पुथंडू, ओडिशाचे नववर्ष बिहूसह अनेक राज्यांतील नववर्षानिमित्त तसेच सुगीच्या हंगामानिमित्तही मोदींनी शुभेच्छा दिल्या.

राहुल गांधींचे अभिवादन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांनी ट्विट केले की, ‘डॉ.आंबेडकरांनी देशाला पवित्र राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांत मजबूत आधारस्तंभ दिला. बाबासाहेबांचे जीवन जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणादायी आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com