World Bicycle Day : सायकलवरून येऊन केंद्रीय मंत्र्याने स्वीकारला पदभार

Cycle
Cycle

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (सोमवार) चक्क सायकलवर येऊन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन ही खाती देण्यात आली आहेत. दिल्लीतून खासदारपदी निवडून आलेले हर्षवर्धन यापूर्वीही मंत्री राहिलेले आहेत. आज त्यांनी चक्क घरापासून सायकलवरून संसदेत येत मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. दिल्लीत प्रदूषणाचा मोठा प्रश्न असून, यानिमित्ताने त्यांनी सायकल वापरण्याचाही सल्ला दिला आहे. जागतिक सायकल दिनाचेही आज निमित्त होते.

यानंतर त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सायकल ही चालविण्यासाठी सहज उपलब्ध असते. यामुळे प्रदूषणही होत नाही. सायकलिंग हा माझा आवडता खेळ असून, आज जागतिक सायकल दिनसुद्धा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com