डॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपूत्र : प्रणव मुखर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

डॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपूत्र होते. त्यांना मी नमन करतो, असे त्यांनी नोंदवहीत नमूद केले. 

नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज (गुरुवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी येथे दाखल झाले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. तत्पूर्वी मुखर्जी यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते म्हणाले ''संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपूत्र होते. त्यांना मी नमन करतो'', अशा शब्दांत मुखर्जी यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रणव मुखर्जी सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते संघ मुख्यालयात भेट देणार आहेत. त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. मुखर्जी म्हणाले, डॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपूत्र होते. त्यांना मी नमन करतो, असे त्यांनी नोंदवहीत नमूद केले.

दरम्यान, संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुखर्जी यांचे स्वागत केले. तर मुखर्जी यांना मोहन भागवत यांनी महाल परिसरात असणाऱ्या हेडगेवार यांच्या निवासस्थानाची माहिती दिली. 

Web Title: Dr Hedgewar was indias great son says Pranab Mukherjee