थेट अयोध्येतून : वक्फ बोर्ड म्हणजे केवळ दुकानदारी ! (व्हिडिओ)

मंगेश कोळपकर 
Sunday, 10 November 2019

डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. कारसेवकपूरममध्ये रविवारी सकाळी ते आल्यावर 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. 
खान म्हणाले, "कोर्टाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला निकालात न्याय दिला आहे. त्यामुळे हा विषय आता वाढवू नका. रिव्ह्यू पिटीशन करून काही उपयोग होणार नाही."

अयोध्या : "मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरं झालं कोर्टाने त्यांची दुकानदारी बंद केली," सांगत आहेत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान 'सकाळ' शी बोलताना. 

डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. कारसेवकपूरममध्ये रविवारी सकाळी ते आल्यावर 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. 
खान म्हणाले, "कोर्टाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला निकालात न्याय दिला आहे. त्यामुळे हा विषय आता वाढवू नका. रिव्ह्यू पिटीशन करून काही उपयोग होणार नाही."

बाबरी मशीद जमीनदोस्त होत होती आणि सुरक्षा दल निष्क्रीयपणे पाहत होतं!
रामानं घडवलेलं राजकीय महाभारत!

वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहे. उगाच भावना भडकावून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहे. या बोर्डला मुस्लिम समाजाची काळजी होती तर तिहेरी तलाख का नाही त्यांनी बंद केला ? , असा प्रश्न उपस्थित करून आगामी काळात राम मंदिर आणि मशिद उभारणीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

गोमाता ते रामलल्ला!
रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नव्हे!
थेट अयोध्येतून : राममंदिरासाठी 65 टक्के कोरीव काम पूर्ण! (Video)
रामजन्मभूमीसाठी अशी सुरू झाली कारसेवा!
Ayodhya Verdict : अयोध्यातील घटनाक्रम : 1528-2019 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Khan talked about Wakf board after ayodhya verdict