'मनमोहनसिंग आपल्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाहीत'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

न्यू तेहरी (उत्तराखंड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अमित शहा यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांपासून ते दूर पळून जाऊ शकत नसल्याचे म्हणत टीका केली आहे.

येथील एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले, "मनमोहनसिंग कोणत्याही भ्रष्टाचाराची जबाबदारी घेत नाहीत, हे सत्य मोदी यांनी सांगितले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहारापासून ते दूर जाऊ शकत नाहीत. गेल्या अडीच वर्षात आम्ही एक महत्त्वाची गोष्ट केली. आम्ही या देशाला बोलणारा पंतप्रधान दिला. मात्र, कॉंग्रेसने आपल्याला एक असा पंतप्रधान दिला होता की, जो फक्त कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या आईचाच आवाज ऐकत होता.'

"डॉ. मनमोहनसिंग यांचा देशाच्या अर्थकारणावर प्रदीर्घ काळ दबदबा होता. त्यांच्या काळात इतके गैरव्यवहार झाले; पण डॉ. मनमोहनसिंग यांना एकही डाग लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून स्नान करणे ही कला तर डॉक्‍टरसाहेबच जाणोत', अशी टीका मोदी यांनी बुधवारी केली होती.

Web Title: Dr Manmohan Singh cannot run away from scams place under his regime