कारदगा मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. रा. रं. बोराडे

कारदगा मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. रा. रं. बोराडे

मांगूर - कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे रविवारी (ता. २५) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत २३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. औरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्‌घाटन दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते तर साम वाहिनीचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल.

मुंबई येथील डॉ. आनंद काटीकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, तर ॲड. सी. बी. कोरे-रेंदाळकर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्‌घाटन होईल. ग्रामपंचायत अध्यक्षा शिवूबाई गावडे या स्वागताध्यक्षा असतील, अशी माहिती साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षा कल्पना रायजाधव यांनी रविवारी (ता. ११) आयोजित बैठकीत दिली.

प्रशांत कांबळे यांनी स्वागत केले. रायजाधव म्हणाल्या, ‘‘सकाळी ८ ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडी, सकाळी १० वाजता उद्‌घाटन होणार आहे. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, अरिहंतचे संस्थापक रावसाहेब पाटील, दूधगंगा साखर  कारखान्याचे चेअरमन अमित कोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक लक्ष्मण चिंगळे, जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, साई उद्योग समुहाचे संस्थापक प्रदीप जाधव, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे, रामभाऊ पाटील यांच्यासह मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्रात ‘आम्ही घडलो तुम्हीही घडा’ (अनुभव कथन), लेखिका कल्पना रायजाधव (कारदगा), किलबिल (बालकविता), महाचंद्र, (काव्या कविता) कवी कबीर वराळे-निपाणी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी एक वाजता ‘आम्ही वारसदार मावळ्यांचे’ या विषयावर शीतलताई मालुसरे-महाड यांचे व्याख्यान, तिसऱ्या सत्रात दुपारी २. ३० वाजता शाश्वत ग्रामविकास यावर पुणे येथील माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान होईल.

चौथ्या सत्रात दुपारी चार वाजता कवी नितीन देशमुख - अमरावती, नारायण पुरी - औरंगाबाद, रवींद्र केसकर - उस्मानाबाद यांचे कवी संमेलन, पाचव्या सत्रात सायंकाळी ५.३० वाजता इचलकरंजी येथील आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रा. कपिल पिसे यांचा ‘चिंगी’ ही एकांकिका, सहाव्या सत्रात सायंकाळी सहा वाजता प्रकाश सुतार, राम सुतार यांचा बासरीवादन व संगीतलहरी कार्यक्रम, सातव्या सत्रात सायंकाळी ६. ४५ वाजता शाहीर धोंडीराम मगदूम-दऱ्याचे वडगाव यांचा लोकसंस्कृती व लोककलेवर आधारित लोकजागराचा कार्यक्रम होणार आहे.

साहित्य विकास मंडळ व कोल्हापूर येथील पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १२) ते शुक्रवारी (ता. १६) अखेर रोज पहाटे ५ वाजता डी. एस. नाडगे  कॉलेजच्या पटांगणात मोफत योग, प्राणायाम शिबीर होणार आहे. सदाशिव पारगावे, सदाशिव खोत, प्रशांत खराडे, बाळासो नाडगे, प्रकाश काशीद, सुनीता कोगले, भाऊसो चिंदके, महावीर पाटील, आप्पासो कुरणे, प्रकाश भागाजे, संजय नवनाळे, सुचित बुडके, सुभाष ठकाणे, रंगराव बन्ने, अमोल व्हनवाडे, शिवाजी माने, विनोद परिट यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com