DRDOचे DIPCOVAN किट; अँटिबॉडी तपासता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DIPCOVAN

डीआरडीओ (DRDO) लॅबने अँटिबॉडी डिटेक्शन किट DIPCOVAN विकसित केली आहे

DRDOचे DIPCOVAN किट; अँटिबॉडी तपासता येणार

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- डीआरडीओ (DRDO) लॅबने अँटिबॉडी डिटेक्शन किट DIPCOVAN विकसित केली आहे. या किटच्या साहाय्याने अँटिबॉडीची शरीरातील वाढ, त्याचबरोबर SARS-CoV-2 विषाणूमधील nucleocapsid प्रोटिनचा शोध लावता येणे शक्य आहे. डीआरडीओने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या किटची निर्मिती दिल्लीतील Vanguard Diagnostics Pvt Ltd कंपनीसोबत मिळून करण्यात आली आहे. (DRDO lab develops an antibody detection based kit DIPCOVAN)

DIPCOVAN अँटिबॉडी डिटेक्शन किटमुळे कोरोनाविरोधातील लढ्यात मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या किटची निर्मिती भारतीय संशोधकांनी केली होती. याच्या निर्मितीसाठी दिल्लीतील विविध हॉस्पिटलमधील 1 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले होते.

किटचे उत्पादन यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. अँटिबॉडी डिटेक्शन किटला ICMR कडून 2021 एप्रिलला मंजुरी देण्यात आली आहे. मे 2021 ला डीसीजीआय, CDSCO, आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्रालयाकडून विक्री आणि वितरणासाठी मंजुरी मिळाली आहे.

loading image
go to top