
Pradeep Kurulkar: प्रदीप कुरूलकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रदीप कुरूलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कुरुळकरांची आज ATS कोठडी संपली होती त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील विशेष न्यायालयाने सोमवारी प्रदीप कुरुळकरच्या पोलीस कोठडीत १६ मेपर्यंत वाढ केली होती. कुरुळकरच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना सरकारी वकिलांनी शास्त्रज्ञाच्या मोबाईल फोनवरील संभाषणांचा शोध घेण्याची गरज असून या कामात पोलिसांना आरोपींची मदत आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. Latest Marathi News
प्रकरण काय आहे?
डीआरडीओ संचालक आणि शास्त्रज्ञ असलेले प्रदीप कुरूलकर हे २०२२ पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली. arathi Tajya Batmya
त्यांनी हनीट्रपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या महिली गुप्त एजेंटनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क केला होता. तेव्हापासूनच व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते. एटीएस आधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरुलकर यांनी महिलेशी व्हिडीओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं.