"डीआरडीओ'ने संशोधनाकडे लक्ष द्यावे : सीतारामन

"डीआरडीओ'ने संशोधनाकडे लक्ष द्यावे : सीतारामन

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) कान टोचले. "डीआरडीओ'ने आत्मपरीक्षण करत संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे, असे सीतारामन म्हणाल्या. 

निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत आज संरक्षण मंत्रालयाच्या "रक्षा ग्यान शक्ती' या अभियानाची सुरवात झाली. याअंतर्गत बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) संस्कृती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. ""डीआरडीओने संधोधन आणि विकासामध्ये अधिक मोठी भूमिका बजावणे आवश्‍यक आहे. यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करावे. संशोधन हे अत्यंत अवघड क्षेत्र असून त्याचा परिणाम पाहण्यासाठी मोठा काळ जावा लागतो. त्यामुळे डीआरडीओने आपले लक्ष पुन्हा एकदा संशोधनकाकडे वळवावे आणि सरकार देऊ करत असलेल्या पाठबळाचा आणि संधीचा फायदा उठवावा,'' असे सीतारामन म्हणाल्या.

संरक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणून संशोधनाच्या आड येणारे अडथळे दूर करावे, अशा सूचनाही त्यांनी आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिल्या. संरक्षण क्षेत्रात संशोधनाचा विकास झाल्यास त्याचा व्यापारी तत्त्वावरही फायदा होऊ शकतो, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com