'स्त्री'ची वेशभूषा हे बलात्काराचे कारण नाही - निर्मला सितारामन

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

10 पैकी 7 बलात्कार किंवा अत्याचार हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच होताना दिसतात. यावरही पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे.

नवी दिल्ली : 'स्त्रीची वेशभूषा ही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे कारण असूच शकत नाही, स्त्रीच्या वेशभूषेवरूनच तिच्यावर बलात्कार होतात, असा दावा करणे अत्यंत निंदनीय आहे. जर कपडे बघून बलात्कार होतात, तर वृद्ध स्त्रीवर बलात्कार कसा होतो?' असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी (ता. 7) केला. 

जेव्हा महिलांवर अत्याचार होतो, तेव्हा इतर कोणतेही विभाग यात लक्ष घालताना दिसत नाहीत. महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर बलात्कार होतो अशी मानसिकता असणेच वाईट आहे. कपड्यांवरून बलात्कार होत असतील, तर वृद्ध महिलांवर कसे काय बलात्कार होतात, असे विचारात सितारामन महिलांवरील अत्याचारावर भाष्य केले.

विधी संस्थांनी किंवा सुरक्षा यंत्रणांनी महिलांबाबत आणखी काळजी घेत सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. 10 पैकी 7 बलात्कार किंवा अत्याचार हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच होताना दिसतात. यावरही पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांची मानसिकता बदलणे हे आपल्या कुटुंबावरच अवलंबून असते. त्यामुळे तशी शिकवण ही कुटुंबातूनच मिळायला हवी, असे सितारामन यांनी 'स्टोरीज् दॅट मॅटर' या कार्यक्रमात बोलताना सांगितले.   

 
  

Web Title: Dress Not Reason Behind Rape said by nirmala sitaraman