आता नव्या वाहनपरवान्यातही येणार QR Code

वृत्तसंस्था
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : सध्या दिला जाणाऱ्या वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांमध्ये (आरसी) मोठे बदल केले जाणार आहेत. या नव्या बदलानुसार वाहनपरवाना आणि आरसी एका विशिष्ट रुपात मिळणार आहे. यामध्ये रंग, डिझाईन आणि सुरक्षेच्या मानकामध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. पुढील वर्षी जुलै महिन्यात दिले जाणाऱ्या वाहनपरवान्यात हे बदल केले जाणार आहेत.

सध्या वाहनपरवाना आणि वाहनाचे कागदपत्रे (आरसी) स्मार्टकार्ड स्वरूपात दिले जात आहेत. मात्र, नव्याने देण्यात येणाऱ्या वाहनपरवाना आणि आरसीमध्ये मायक्रोचिपसह क्यूआर कोड असणार आहे. तसेच या नव्या वाहनपरवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फिचर असेल. या नव्या फिचरमुळे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना संबंधित वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच वाहनचालकाने वाहनपरवाना काढताना अवयवदानाबाबत जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीही यामधून समजणार आहे. याशिवाय अपंगत्व असलेल्या व्यक्तीबाबतची माहित मिळणार आहे.

Web Title: Driving licences to be uniform with QR Codes across India

टॅग्स