देशात भाजपमुळेच दुष्काळ- लालूप्रसाद यादव

यूएनआय
बुधवार, 6 जुलै 2016

नवी दिल्ली- देशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. 

यादव यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की, ‘देशात भाजपचे सरकार आल्यामुळे गेली दोन वर्षे दुष्काळ पडत आहे. परंतु, बिहारमध्ये आमचे सरकार आल्यामुळे आकाशातून मोठ्या प्रमाणात अमृत पडत आहे. सगळे कर्माचे फळ आहे.‘ 

‘जगा आणि जगू द्या, हे आमचे धोरण आहे. परंतु, रिलायन्सचे म्हणणे आहे की, एकाला जगू द्या, बाकीचे मरूद्या. केंद्रातील कॉल ड्रॉप मंत्री तर ड्रॉपच झाले आहेत,‘ असेही यादव यांनी म्हटले आहे.

Web Title: Drought in the country caused by BJP, says Lalu Prasad Yadav