दुष्काळी चाळीसगाव तालुका झाला ‘पाणीदार’

प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त डॉ. चव्हाण यांचा जलप्रहरी पुरस्काराने सन्मान
डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण
डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाणsakal

नवी दिल्ली : ‘पाणी हे जीवन आहे, त्याचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे’हा सुविचार प्रत्यक्षात ते जगलेच शिवाय युवक, नागरिक यांच्यात जनजागृती करून त्यांनी चाळीसगाव तालुक्यात ३४ गावे पाणीदार केली.‘मिशन ५०० कोटी लिटर पाणीसाठा’हे ध्येय त्यांनी गाठले. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण असे त्यांचे नाव. या ध्येयासक्त अधिकारी कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेत जलशक्ती मंत्रालयाने जलप्रहरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला.

रांजणगाव (ता. चाळीसगाव) हे डॉ. चव्हाण यांचे गाव. ते प्राप्तीकर विभागाचे सहआयुक्त आहेत. मुंबईत नोकरी करतानाही त्यांनी जलसंचयाचा वसा सोडला नाही. चाळीसगाव तालुक्यातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी त्यांनी काम केले. तालुक्यातील प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट ठेवले. ‘५०० कोटी लिटर पाणीसाठा’हा त्यांच्या उद्दिष्टाचा भाग होता. सरकारवर विसंबून राहण्यापेक्षा लोकजागृतीवर भर दिला. काही सामाजिक संस्थांची मदत घेऊन चव्हाण यांनी गावकऱ्यांची स्वप्नपूर्ती केली.

‘सकाळ’ने या कार्याची दखल घेऊन त्यांना मदतीचा हात दिला. ‘नाम’,पाणी फाउंडेशनसारख्या संस्था त्यांच्या मदतीला आल्या, असे डॉ. चव्हाण अभिमानाने सांगतात. त्यांच्या या कार्याचा गौरव जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे.‘जलपुरुष’राजेंद्रसिंह, खासदार उन्मेष पाटील, गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत डॉ. चव्हाण यांचा जलप्रहरी पुरस्कार देऊन करण्यात आला. जलसंधारणाच्या कामाबाबद्दल महराष्ट्रातील विविध भागात काम करणाऱ्या अनिकेत लोहिया, दीपक मोरतळे, शिवाजी घाडगे यांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.

पाण्याचा विचार व्यक्तिगत स्तरावर : डॉ. चव्हाण

‘सकाळ’शी बोलताना चव्हाण म्हणाले, की पाणी हे जीवन आहे म्हणून त्याचा विचार प्रत्येकाला व्यक्तिगत स्तरावर करावा लागेल. हेच सूत्र आम्ही काम करताना समोर ठेवले. म्हणून लोकांमध्ये जागृती केली. पाण्याची गरज त्यांनी पटवून दिली. त्यामुळे आमच्या तालुक्यातील गावे पाण्याबाबत आत्मनिर्भर झाली. ‘‘माझे गाव दुष्काळी भागात आहे. तिथे २०१६-१७ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मन विषण्ण झाले. पाणी नसल्याने शेती बेभरवशाची होती. जलसंधारणासाठी काम करण्याचा निश्चय केला. तरुणांची मनात सुधारणेविषयी चेतना जागविली त्यातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ही चळवळ सुरू झाली. नदी-नाले, विहिरी पुनरुज्जीवित केल्या. आता ३४ गावे पाण्यासाठी स्वावलंबी झाल्याचे मी खात्रीने सांगू शकतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com