'भाग बाबा बादल भाग' - सिद्धू

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

पंजाबच्या अस्तित्वाची लढाई आहे, पंजाबच्या स्वाभीमानाची लढाई आहे. मी जन्मत:च काँग्रेसी आहे. माझी घरवापसी झाली आहे. पंजाब आपला गौरव आहे. अमली पदार्थांनी पंजाबचे मोठे नुकसान केले आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत पंजाबला लुटण्याचे काम करण्यात आले. अमली पदार्थांच्या विळख्यामुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले. पंजाबची जनता आता तुमच्यासमोर येत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बादल यांनी खुर्ची खाली करावी, असा जोरदार टीका काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली.

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज (सोमवार) त्यांनी पत्रकार परिषद घेत पंजाबमधील सत्ताधारी अकाली दल व भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

सिद्धू म्हणाले, की ही पंजाबच्या अस्तित्वाची लढाई आहे, पंजाबच्या स्वाभीमानाची लढाई आहे. मी जन्मत:च काँग्रेसी आहे. माझी घरवापसी झाली आहे. पंजाब आपला गौरव आहे. अमली पदार्थांनी पंजाबचे मोठे नुकसान केले आहे. पंजाबचे राजकारणी त्यांच्यासोबत असल्याने पोलिस काहीच करू शकत नाहीत. शेतकऱ्यांना भिकारी बनवून ठेवले. पंजाबमध्ये आज 55 टक्के नागरिक युवा आहेत. त्यांना योग्य दिशा मिळत नाही. त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना आत्मविश्वास दिला तरच पंजाब पुढे जाईल. सुखबीरसिंग बादल परदेशात शिक्षण घेऊन आले, पण पंजाबसाठी काहीच केले नाही. इथे फक्त धंदा करत आहेत. पंजाबच्या विकासासाठी लढणार', 'पंजाबच्या विकासासाठी व्यासपीठ मिळाले आहे.

Web Title: Drugs are reality in Punjab, lives of youth are being destroyed says Navjot Singh Sidhu