गोव्यात NCB ची मोठी कारवाई; ड्रग्जप्रकरणी दोन महिला अटकेत

या महिलांविरुद्ध एनसीबीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Drugs
DrugsSakal

पणजी - एनसीबीने उत्तर गोव्यातील (Goa) अर्पोरा भागात छापा टाकून दोन ड्रग्ज (Drugs) विक्रेत्यांना महिलांना अटक केली आहे. यातील एक महिलाही परदेशी ड्रग्ज विक्रेती असल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन्ही महिला तस्करांकडून अमली पदार्थ एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या महिलांविरुद्ध एनसीबीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Drugs
घानामध्ये भीषण स्फोट; १७ जणांचा मृत्यू, शेकडो इमारतींचे नुकसान

दरम्यान याआधीही गोव्यात एनसीबीने (NCB) ड्रग्ज विक्रेत्यांना पकडण्यासाठी धाडी टाकल्या आहेत. २०२१ या वर्षाच्या शेवटीही मोठी कारवाई करण्यात आली होती. या प्रदेशात बऱ्याचवेळा अनेक ठिकाणी मोठे ड्रग्ज साठे सापडले आहेत. वारंवार या ठिकाणी एनसीबीने विशेष पथके नेमूण कारवाई केली आहे. आता केलेल्या या कारवाईमुळे अनेक आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

Drugs
कालीचरण नौपाडा पोलिसांच्या ताब्यात; ठाणे कोर्टात करणार हजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com