Video: झिंगाट नवरदेवाने असा नागीन डान्स केला अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

उत्तर प्रदेशात विवाहादरम्यान नागीन डान्स करण्याची प्रथा आहे. परंतु, एका विवाहादरम्यान झिंगाट झालेल्या नवरदेवाने असा नागीन डान्स केला की त्याला विवाहादरम्यान उभेही राहता येत नव्हते.

लखनौ: उत्तर प्रदेशात विवाहादरम्यान नागीन डान्स करण्याची प्रथा आहे. परंतु, एका विवाहादरम्यान झिंगाट झालेल्या नवरदेवाने असा नागीन डान्स केला की त्याला विवाहादरम्यान उभेही राहता येत नव्हते. नवरीने त्याच क्षणी निर्णय घेतला आणि त्याला विवाहसमारंभारतच नकार दिला.

लखीमपूर येथील एका विवाहादरम्यान झालेला नागीन डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत नवरदेवाने आपल्याच वरातीमध्ये तुफान नागीन डान्स केला. नवरदेवाने एवढे मद्य प्यायले होते की त्याला उभेही राहता येत नव्हते. मद्यधुंद अवस्थेत भरपूर नाचल्यानंतर नवरदेव हातात हार घेऊन उभा राहिला. पण, नवरदेवाची ही अवस्था बघून नवरीही हादरून गेली. झिंगाट झालेल्या नवऱयासोबत आयुष्य कसे काढायचे हा विचार करून तिने तत्काळ विवाह न करण्याचा निर्णय घेतला.

विवाह मंडपात नवरीने घेतलेल्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये भांडणे सुरू झाली. भांडण वाढू लागल्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवरीने आपली भूमिका शेवटपर्यंत ठाम ठेवली. दारूड्या युवकासोबत आयुष्य काढू लग्न करणार नाही, अशी भूमिका युवतीने घेतली. अखेर झिंगलेल्या नवरेदवाची दारू उतरल्यानंतर नवरीशिवाय परत जावे लागले. पण, युवतीच्या निर्णयानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunk groom nagin dance video viral bride call off her marriage after nagin dance in up