दारूड्याने खाल्ला जीवंत साप अऩ्...

Drunk UP Man Bites Snake
Drunk UP Man Bites Snake

लखनौः उत्तर प्रदेशातील इटाह गावातील राज कुमार नावाच्या व्यक्ती प्यायली होती. दारूची नषा चढल्यानंतर त्यांना एक साप दिसला. सापाचे त्यांनी दाताने तुकडे करत काही भाग खाल्ला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज कुमार यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी रविवारी (ता. 28) दारूचे सेवन केले होते. दारूची नशेत असताना त्यांनी एक जिवंत साप पकडला आणि त्याचे दाताने तुकडे केले. सापाचा काही भाग तसाच खाल्ला. काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, गुजरातमध्ये अशाप्रकारची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सतरामपूर तालुक्यातील अजनवा गावात पर्वत गाला बारीया (वय 60) हे शेतातील वाळलेले गवत ट्रकमध्ये भरण्याचे काम करत होते. गवातामधून अचानक साप बाहेर आला. सापाला पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असलेले बाजूला पळाले. मात्र, पर्वत जागेवरून हाललेच नाहीत. मी, यापूर्वीही साप पकडले आहेत, असे सांगत तेथेच उभे राहिले आणि सापाला पकडले. परंतु, सापाने त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला दंश केला. सापाने केलेल्या दंशामुळे पर्वत चिडले आणि सापाचा कडकडून चावा घेतला. काही वेळातच सापाचा मृत्यू झाला पर्वत यांना उपचारासाठी प्रथम लुनवाडा व गोध्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सापाचे विष शरीरात पसरल्याने पर्वत यांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com