video : भर रस्त्यात त्याने घेतला पोलिसाचा 'किस'

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

एका युवकाने भर रस्त्यात पोलिस अधिकाऱयाला मिठी मारून चुंबन घेतल्याची घटना घडली आहे.

हैदराबादः एका युवकाने भर रस्त्यात पोलिस अधिकाऱयाला मिठी मारून चुंबन घेतल्याची घटना येथे घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पौडेल भानू (वय 28) असे त्या युवकाचे नाव असून, त्यावेळी त्याने दारू प्यायली होती.

पोलिसाने तरूणाच्या या कृत्यानंतर त्याच्या कानशिलात लगावल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रविवारी (ता. 28) रात्री बोनालू उत्सवाच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. उत्सवादरम्यान नागरिक रस्त्यावर नृत्य करताना दिसत आहेत. यावेळी पोलिस अधिकारी तेथून जात होते. पौडेल भानू याने पोलिस अधिकाऱयाजवळ जात मिठी मारली व चुंबन घेतले. यावेळी पोलिस अधिकाऱयाने त्याला धक्का देत त्याच्या कानशिलात लगावली.

नल्लाकुंता पोलिस स्टेशनचे निरीक्षक के. मुरलीधर म्हणाले की, भारतीय दंड संहिताच्या कलम 353नुसार पौडेल भानू याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. तो एका खासगी बँकमध्ये काम करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunk man hugs and kisses police officer on duty at hyderabad