दारुड्याच्या अंगावरून तीन रेल्वे गेल्या पण...

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

एका व्यक्तीने दारू प्यायली आणि नशेत रेल्वे रुळावर जाऊन झोपला. काही वेळातच एका पाठोपाठ तीन रेल्वे गेल्या. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शंका वाटत असतानाच ती व्यक्ती उठून बसली. मध्यप्रदेशातील अशोक नगर येथे ही घटना घडली.

भोपाळ : एका व्यक्तीने दारू प्यायली आणि नशेत रेल्वे रुळावर जाऊन झोपला. काही वेळातच एका पाठोपाठ तीन रेल्वे गेल्या. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शंका वाटत असतानाच ती व्यक्ती उठून बसली. मध्यप्रदेशातील अशोक नगर येथे ही घटना घडली.

अशोकनगर रेल्वे स्टेशनपासून 2 किमी लांब अंतरावरील रेल्वे रुळावर एकाचा मृतदेह आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेल्वे धावत होत्या. तिसरी रेल्वे गेल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीच्या दिशेने निघाले असता ती व्यक्ती उठून बसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

3 trains pass over him, MP cops come to rescue, man says: Papa aa gaye

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर एक मृतदेह असल्याची माहिती एका लोको पायलटने रात्रीच्या वेळी दिली. पोलिस त्या ठिकाणी पोहचेपर्यंत तीन रेल्वे ट्रॅकवरून गेल्या होत्या. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता होती. पोलिसांनी रुळावर पडलेल्या व्यक्तीला उचलणार तेवढ्यात ती व्यक्ती उठून बसली अन् बाबा आले असे म्हणाला.

संबंधित व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव धर्मेंद्र आदिवासी असल्याचे समजले. जास्त दारू प्यायल्याने आपण ट्रॅकवर झोपलो हेसुद्धा त्याला कळले नाही. पोलिसांनी त्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी धर्मेंद्रची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला घरी सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunk man sleeps on railway tracks as 3 trains pass over him at mp