धक्कादायक ! विमानात एकाने केली महिला प्रवाशाच्या सीटवर लघवी

Drunk man urinates on woman passengers seat in Air India
Drunk man urinates on woman passengers seat in Air India

नवी दिल्ली : विमानातील एका दारूड्या प्रवाशाने महिला प्रवासी बसलेल्या जागी लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्क-दिल्ली विमानात हा प्रकार घडला. या विचित्र अशा प्रकारामुळे महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

संबंधित महिला प्रवाशाच्या कुटुंबीयांनी सांगितले, की न्यूयॉर्क-दिल्ली विमानप्रवासादरम्यान एका दारूड्या पुरूषाने महिला प्रवासी बसलेल्या जागेवर लघवी केली. जेव्हा दिल्ली विमानतळावर विमानाचे लँडिंग झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. दारूडा प्रवासी तसाच पळून गेला. याबाबतची माहिती विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना संबंधित महिला प्रवाशाच्या न्यूयॉर्क येथील इंद्रानी घोष या मुलीने ट्विट करून दिली. 

याबाबत इंद्रानी यांनी ट्विट केले, की ''एआय 102 येएफके ते दिल्ली, सीट क्र. 36-डी या जागेवर माझी आई विमानातून प्रवास करत होती. तिच्यासोबत आमच्या घरातील कोणीच नव्हते. याप्रवासादरम्यान तिला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. रात्रीचे जेवण आटोपून सर्वजण परत आले होते. तेव्हा एका दारूड्या प्रवाशाने त्याची पँट काढून माझी आई ज्या जागेवर बसली होती, त्या जागेवर त्याने लघवी केली. विमानातील या सर्व प्रकारामुळे माझ्या आईला धक्काच बसला आहे''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com