वाराणसीत पुलाचा भाग कोसळून 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

वाराणसी येथील केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून, या ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातील बाधितांना वाचविण्यासाठी बचावपथक घटनास्थळी पोहचले. 

वाराणसी : वाराणसी येथील केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून, या ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातील बाधितांना वाचविण्यासाठी बचावपथक घटनास्थळी पोहचले. 

वाराणसीच्या केंट रेल्वे स्टेशनजवळील वसुंधरा महाविद्यालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ ही घटना घडली. पूल अचानक कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्यात अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पूल वाराणसी केंट रेल्वे स्टेशनच्या जवळ तयार होत होता. त्यादरम्यान याचा एक भाग अचानकपणे कोसळला. यातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले जात आहे. हा भाग शहरातील सर्वात वर्दळ असलेला भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अत्यंत वर्दळ असल्याने या ढिगाऱ्याखाली अनेक चारचाकी वाहने अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि मंत्री नीलकंठ तिवारी यांना वाराणसीला जाण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत.

Web Title: Due to Bridge collapses12 people die in Varanasi