जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपुष्टात : अरुण जेटली

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

जीएसटीमुळे करसंकलनात वाढ तर झाली असून, याशिवाय आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कर कमी झाल्याने नागरिकांना दिलासाही मिळाला आहे. अॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे उत्पन्नात वाढ झाली असून, जीएसटीमुळे भारत संघटित बाजारपेठ बनला आहे.  

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) देशात अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपली आहे. 'अॅडव्हान्स टॅक्स पेमेंट'मुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच जीएसटीमुळे भारत संघटित बाजारपेठ बनला आहे, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीबाबत भाष्य केले.

जीएसटी प्रणाली लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यावर आज जीएसटीबाबत जेटलींनी वक्तव्य केले. ते म्हणाले, जीएसटीमुळे करसंकलनात वाढ तर झाली असून, याशिवाय आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कर कमी झाल्याने नागरिकांना दिलासाही मिळाला आहे. अॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे उत्पन्नात वाढ झाली असून, जीएसटीमुळे भारत संघटित बाजारपेठ बनला आहे.  

पुढे ते म्हणाले, मागील वर्षी जुलैमध्ये आम्ही देशातील सर्वात मोठी गुंतागुंतीची कर प्रणाली संपुष्टात आणली. तेव्हा 13 मल्टिपल टॅक्सेस आणि 5 मल्टिपल कर परतावे अस्तित्वात होते. टॅक्सवर टॅक्स लागत असल्याने करदाते निराश होते. प्रत्येक राज्याचे स्वत:चे वेगवेगळे कर दर होते आणि त्यानुसार कर परतावा भरला जात होता.

Web Title: Due to the complexity of indirect taxes stopped due to GST