'रेल्वेची आर्थिक स्वायत्तता संपुष्टात येईल!'

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन केल्याने रेल्वे विभागाची आर्थिक स्वायत्तता संपुष्टात येईल आणि ही प्रक्रिया लालफितीत अडकेल, अशी चिंता कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना खर्गे म्हणाले, "रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करणे योग्य नसल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. कारण रेल्वे विभागाला प्रत्येक गोष्टीसाठी वित्त विभागाकडे जाऊन उभे राहावे लागेल. इतकेच नव्हे तर काही तातडीच्या बाबतीतही रेल्वे विभागाला अर्थमंत्रालयाची मागणी घ्यावी लागेल.‘ तसेच "रेल्वे अर्थसंकल्प विलीकरणाची प्रक्रिया लालफितीत अडकेल. सरकार रेल्वेचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असून रेल्वे विभागा प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी सरकार खाजगी चालकांना रेल्वे चालविण्यासाठी निमंत्रित करेल अशी मला खात्री आहे‘, असेही खर्गे पुढे म्हणाले.

रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केल्याने रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया अलिकडे आणण्यालाही मंत्रिमंडळाने होकार दर्शविला आहे, याबबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी माहिती दिली.

Web Title: "Due to the economic autonomy of the railways! '