मुलीला चर्चबाहेर सोडून देतानाही 'तो' गहिवरला

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

बिट्टो (32) आणि त्याची पत्नी प्रतिभा (28) यांनी शनिवारी सायंकाळी एडप्पली येथील सेंट जॉर्ज फँरेन चर्च येथे बाळाला सोडले. थिस्सूरमधील वडक्कनचेरी भागातील बेपत्ता शिशुसह चार बालकांची तपासणी पोलिसांनी केली.

थिस्सूर : केरळमध्ये एका दांपत्याने पाच दिवसांच्या बाळाला सोडून दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या दांपत्याला यापूर्वी तीन अपत्य असून, चौथे अपत्य झाल्याने समाजाच्या भीतीने त्यांनी त्या बालिकेला येथील एका चर्चमध्ये सोडून पळ काढला. मात्र, त्यापूर्वी त्याने त्या बालिकेचे चुंबन घेत तो गहिवरला. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला.

बिट्टो (32) आणि त्याची पत्नी प्रतिभा (28) यांनी शनिवारी सायंकाळी एडप्पली येथील सेंट जॉर्ज फँरेन चर्च येथे बाळाला सोडले. थिस्सूरमधील वडक्कनचेरी भागातील बेपत्ता शिशुसह चार बालकांची तपासणी पोलिसांनी केली. या दोघांवर 12 वर्षांच्या आतील मुलाला सोडून देणे आणि 'ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट्टो यांनी चौकशीदरम्यान सांगितले, की प्रतिभा चौथ्यांदा गर्भवती असताना स्थानिक लोकांनी तिच्याबाबत चर्चा सुरु केली होती. मात्र, याबाबतची विस्तृत माहिती घेण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, चर्चमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सायंकाळी आडेआठच्या सुमारास चर्चबाहेर बाळ आढळले. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांना कळविले. फुटेजमध्ये बाळाला खाली ठेवण्यापूर्वी वडील त्याचे चुंबन घेत असल्याचे दिसले. बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Due to fear of community left fourth child infront church

टॅग्स