"गांधी घराण्यामुळे आजही काँग्रेस नेत्यांची पक्षात घुसमट होते"

Due to the gandhi family Congress leaders are still discomfort in party
Due to the gandhi family Congress leaders are still discomfort in party

नवी दिल्ली, ता. २५ - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली; त्याला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्तारूढ भाजपने आज काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. सत्तेच्या हव्यासापोटी एका घराण्याने एका रात्रीत देश तुरुंगात बदलला, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. या घराण्यामुळेच आजही अनेक काँग्रेस नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी गुरुवारी केला. 

मोठी बातमी! भारतीय अवकाश क्षेत्र  खासगी कंपन्यांसाठी खुले 
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ अशी २१ महिने देशात आणीबाणी लागू केली होती. त्याला आजच्या दिवशी ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांनी ट्विटद्वारे सांगितले की, आणीबाणीविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचे बलिदान देश विसरू शकणार नाही, त्यांच्या त्यागाला मी शतशः नमन करतो. 

या शुक्रवारी तुम्ही बदलू शकता तुमचं नशीब; 130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्याची मोठी...
शहा यांनी चार ट्विट करून काँग्रेसच्या राजघराण्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले की, एका घराण्याचे हित पक्ष व राष्ट्रीय हितांच्याही वरचे ठरले आहे. आणीबाणीची मानसिकता आजही काँग्रेसमध्ये कायम आहे. ती एका घराण्यात आहे. यामुळे पक्षाचे नेतेही बोलू शकत नाहीत. जनतेपासून हा पक्ष अधिकाधिक दूर चालला आहे. 

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य, म्हणतात...
भाजपच्या अनेक नेत्यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे संपूर्ण राजकारण त्या आणि त्याच एका घराण्याला वाचविण्यासाठीच आज ४५ वर्षांनंतरही सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकार देशात लोकशाहीचे खरे संवर्धन करीत आहे, असं  माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. तर, आणीबाणीला विरोध करणारे सत्याग्रही तपस्वीच होते. भीषण यातना सोसून त्यांनी संघर्ष केला व अखेर भारताच्या लोकशाही मूल्यांनी वर्चस्ववादी अधिनायकवादी मानसिकतेवर विजय प्राप्त केला, असं म्हणत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हल्ला चढवला आहे. कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. देशाच्या इतिहासातील हा एक क्रूर दिवस होता. मात्र, अखेर लोकशाहीचा विजय झाला. लक्षावधी सत्याग्रहींनी त्यासाठी लढा दिला, असं ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com