esakal | बिहारच्या शाही लिचीचा गोडवा उतरला; लॉकडाउनमुळे खरेदी अडली
sakal

बोलून बातमी शोधा

lichi

मुझफ्फरपूरच्या ‘शाही’ लिची खेरेदीवर यंदा संक्रात आली आहे.  लॉकडाउनमुळे बिहार व इतर राज्यांमधील व्यापारी पोचू शकत नसल्याने आत्तापर्यंत ९० टक्के बागांची खरेदी होऊ शकलेली नाही.  

बिहारच्या शाही लिचीचा गोडवा उतरला; लॉकडाउनमुळे खरेदी अडली

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुझफ्फरपूरच्या ‘शाही’ लिची खेरेदीवर यंदा संक्रात आली आहे. लॉकडाउनमुळे बिहार व इतर राज्यांमधील व्यापारी पोचू शकत नसल्याने आत्तापर्यंत ९० टक्के बागांची खरेदी होऊ शकलेली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन १७ मे नंतर संपल्यानंतर सरकार निर्बंध कसे शिथिल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लिची उत्पादक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी लिचीची तोडणी, ट्रकमध्ये भरणे आणि वाहतूक सुरू करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. जिल्हा विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. 

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

लिची उत्पादक जिल्हे 
मुझफ्फरपूर, वैशाली, समस्तीपूर, पूर्व चंपारण, सीतामढी, भागलपूर, बेगुसराय 

लिचीची उलाढाल (मुशहरी येथील लिची संशोधन केंद्राच्या माहितीनुसार) 
३२ हजार हेक्टर  - पिकाखाली एकूण क्षेत्र 
९,८४० हेक्टर  - मुझफ्फरपूरमधील क्षेत्र 
एक लाख टन - मुझफ्फरपूर जिल्ह्यांतील संभाव्य उत्पादन 
३ लाख टन - संपूर्ण राज्यातील उत्पादन 
३०० कोटी रु - मुझफ्फरपूरमधील उत्पन्न 
१ हजार कोटी रु  - राज्यातील उत्पन्न 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुझफ्फरपूरमधील प्रसिद्ध लिची 
- प्रामुख्याने ‘शाही’ व ‘चायना’ लिचीचे उत्पादन 
- ‘शाही’ लिचीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. 
- झाडाला मोहोर लागण्यास सुरुवात होतात मुंबई, दिल्ली, कोलकता, रांची व काठमांडू येथील व्यापारी आगाऊ रक्कम भरुन बागा खरेदी करतात. 
- मोहोर पाहून किंमत ठरविली जाते