म्हैसुरात दोन हजारांच्या 44 बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

बंगळूर - दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर म्हैसुरात बनावट नोटा सापडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून दोन हजार, 50 आणि 20 रुपयांच्या अशा एकूण 88 हजार 240 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

अजित (हिणकल), रेवण्णा (मंड्या), रोशन (मेटगळ्ळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रंगीत छायाप्रतींचे (झेरॉक्‍स) यंत्र व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

अजित आणि रेवण्णा दोघेही मोटारसायकलवरून वेगाने जात होते.

सरस्वतीपुरममध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्यांना संशयावरून अडवले. त्यांची तपासणी केल्यानंतर दोघांकडे दोन हजारांच्या दहा नोटा आढळल्या. नोटांची तपासणी केल्यानंतर त्या बनावट असल्याचे दिसून आले. चौकशीवेळी रोशन नावाच्या युवकाने नोटा दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी छापा टाकून रोशनला ताब्यात घेतले. रंगीत झेरॉक्‍सच्या साह्याने दोन हजारांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न ते करत होते. म्हैसूरमधील विजयनगरातील घरावर दरोडा आणि मळवळ्ळी तालुक्‍यातील क्‍यातनहळ्ळीत राजकीय नेत्यांच्या घरावर दरोडा घालण्याचा डाव त्यांनी आखल्याचे उघडकीस आले.

Web Title: duplicate currency seized in maisur