लोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला

लोकसभेपूर्वी विरोधक एकवटले; मोदींवर हल्ला

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची तयारी केली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'भारतीय एकता सभा' आयोजित केली. या सभेला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, आमदार जिग्नेश मेवाणी, शरद यादव, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्यासह विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी उपस्थिती लावली. 

या सभेत फारुख अब्दुल्ला म्हणाले, ''स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात आहे. त्यामुळे आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपला संपविण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे''. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देशात नवे संकट उभे राहिले आहे. पूर्वेत्तर राज्यांमध्येही हिंसाचार सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत राहायचे आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे''. 

दरम्यान, राज्यात आलेल्या विविध पक्षांच्या नेतेमंडळींचे स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी स्पिकर्सवरून मोठं-मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. 

'दुर्गा' ममता बॅनर्जीचे पोस्टर

सभेच्या परिसरामध्ये ममता बॅनर्जी यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. यामध्ये 'दुर्गा' देवीच्या रुपात त्यांचे पोस्टर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com