राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान खासदार अहमद यांची प्रकृती अस्वस्थ

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार इ अहमद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार इ अहमद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अहमद यांची प्रकृती बिघडली. संसदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांना प्रथमोपचार दिले आणि त्यानंतर ऍम्ब्युलन्सद्वारे त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्‌विटरद्वारे दिली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. अहमद हे संयुक्त संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होते.

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययुएमएल) अध्यक्ष असलेले अहमद हे केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Web Title: E Ahamed collapses in Parliament during President's address