भूकंपाने आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केलचे धक्के, इमारतींना तडे

आरोग्यमंत्र्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये भूकंपमामुळे काही इमारतींचे नुकसान झाल्याचं दिसतं.
भूकंपाने आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केलचे धक्के, इमारतींना तडे
Summary

आरोग्यमंत्र्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये भूकंपमामुळे काही इमारतींचे नुकसान झाल्याचं दिसतं.

दिसपूर - आसामला बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. आसामसह उत्तर बंगाल आणि इतर राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितलं की, आसामला भूकंपाचे मोठे हादरे बसले. सध्यातरी याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. तेजपूर इथून भूकंप व्हायला सुरवात झाली होती. सिस्मॉलॉजी सेंटरच्या मते, भूकंपाचा पहिला धक्का 7 वाजून 51 मिनिटांनी बसला. त्यानंतर पुढच्या काही मिनिटात इतर ठिकाणीही भूकंप झाला. यामुळे अनेक घरांना तडे गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये भूकंपमामुळे काही इमारतींचे नुकसान झाल्याचं दिसतं. राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विट करून सांगितलं की, राज्यात भीषण भूंकप झाला आहे. सर्वजण सुरक्षित असावेत अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना दक्ष रहावं असंही आवाहन त्यांनी केलं. सध्या सर्व जिल्ह्यांतून माहिती घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याआधी 5 एप्रिलला सिक्किमममध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती. आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. तर भूकंपाचे केंद्र भारत-भूटान सीमेजवळ होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com