ईशान्य भारतासह बिहार, बंगालला भूकंपाचे धक्के

earthquake
earthquake

कोलकाता : ईशान्य भारतातील राज्यांसह बिहार व पश्चिम बंगालला आज (ता. 12) सकाळी सव्वादहच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर व आसाम या राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा बांगलादेशमधील रंगपूर येथील होता. भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती, तर 25 ते 30 सेकंदांपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. 

बिहारमधील पूर्णिया, किशनगंज, कटिहार भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे अनेकजण लगेच घराबाहेर पडले. कोणतीही जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

आज (ता. 12) पहाटेच हरियाणसह जम्मू-काश्मिरच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला होता. हरियाणात पहा़टे पावणेसहाच्या दरम्यान हा धक्का जाणवला, तर जम्मू-काश्मिरला सव्वापाचच्या दरम्यान हा धक्का जाणवला होता. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी होती.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com