esakal | उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांची रस्त्यावर धाव
sakal

बोलून बातमी शोधा

 भूकंपाचे धक्के

उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांची रस्त्यावर धाव

sakal_logo
By
नामदेव कुंभार

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी काळी सहा वाजता उत्तराखंड भूकंपाने हादरलं. अनेक इमारती थरथरल्याने नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्याची रिश्‍टर स्केलवर 4.6 नोंद झाली. भूकंपाच्या हादऱ्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी, पर्यटकांनी रस्त्यावर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्याने डोंगरही हादरले. काही घरांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही. (Earthquake in Uttarakhand)

सुदैवाची गोष्ट म्हणजे, अद्याप जिवीतहानीचे कोणतेही वृत्त नाही. मात्र, स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के जोरदार आणि तीव्र होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार (NCS), भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 4.6 नोंद झाली. जोशीमठ, चमोली, पौडी या जिल्ह्यात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. तुर्तास कोणत्याही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नाही.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा धोका, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात भूंकपाचे सौम्य धक्के बसले होते. भूकंपाचे केंद्र धर्मशालापासून 44 किमी अंतरावर होतं. सुदैवाने भूकंपाच्या हादऱ्याने कोणतेही नुकसान झालं नव्हतं. 1905 मध्ये कांगडामध्ये भूकंपामुळे 10 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

महराष्ट्रातही सकाळी भूकंपाचे धक्के -

हिंगोलीमध्ये शुक्रवारी रात्री साडेदहाच्या आसपास भूकंपाचे तीव्र झटके बसले. यावेळी लोकांमध्ये भितीचं वातावरण होतं. काही लोकांनी रस्त्यावर रात्र काढली. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

loading image
go to top