हिमाचल प्रदेशला भूकंपाचा सौम्य धक्का

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा या भागाला भूकंपाचा धक्का बसला आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारीला चंबा भागात भूकंप झाला होता.

चंबा - हिमाचल प्रदेशला आज (गुरुवार) सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भारतीय भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील चंबा भागाला आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर सीमेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 

चंबा भागातील गावांमध्ये हा भूकंपाचा धक्का जाणविला. कोठेही घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा या भागाला भूकंपाचा धक्का बसला आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारीला चंबा भागात भूकंप झाला होता.

Web Title: Earthquake measuring 3.8 jolts Himachal Pradesh