मेघालयला भूकंपाचा सौम्य धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

ईशान्येकडीन सात राज्ये ही भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी कायम भूकंपाचे धक्के बसतात. या राज्यांना 1897 मध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. या धक्क्यात 1600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

शिलाँग - मेघालय आणि शेजारील राज्यांना आज (रविवार) सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. मेघालयमधील पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूंकपामुळे अद्याप कोठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मेघालयसह शेजारील राज्यांनाही भूकंपाचा धक्के जाणविले. ईशान्येकडीन सात राज्ये ही भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी कायम भूकंपाचे धक्के बसतात. या राज्यांना 1897 मध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. या धक्क्यात 1600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Earthquake measuring 4.5 hits Meghalaya