दिव्यांग मुलांचे शिक्षण सोपे!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

मुलांना विषय समजेल, त्यांचा त्यातील रस वाढेल आणि त्यातून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल, असे प्रयत्न प्राथमिक शिक्षकांना करावे लागतात. त्यात मुले दिव्यांग असल्यास अधिक आपुलकीने आणि सोप्या पद्धतीने शिकवावे लागते. विशेष मुलांना शिकवणे सोपे व्हावे, तसेच त्यांना विषय अगदी सहज समजावेत यासाठी टेक्‍टोपस लर्निंग सोल्यूशन प्रा. लि. हे स्टार्टअप काम करीत आहे. 

मुलांना विषय समजेल, त्यांचा त्यातील रस वाढेल आणि त्यातून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल, असे प्रयत्न प्राथमिक शिक्षकांना करावे लागतात. त्यात मुले दिव्यांग असल्यास अधिक आपुलकीने आणि सोप्या पद्धतीने शिकवावे लागते. विशेष मुलांना शिकवणे सोपे व्हावे, तसेच त्यांना विषय अगदी सहज समजावेत यासाठी टेक्‍टोपस लर्निंग सोल्यूशन प्रा. लि. हे स्टार्टअप काम करीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जन्मजात आलेल्या दुर्धर व्याधीमुळे दिव्यांग असलेल्या मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी स्वतंत्र शाळाही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांना शिकवताना अनेक अडचणींचा सामना त्यांच्या पालक आणि शिक्षकांना करावा लागतो. यावर उपाय शोधण्यासाठी नवनवीन संशोधने देखील होत आहेत. दिव्यांगांमध्ये अनेक प्रकारचे आजार असल्याने कोणतेही एक साधन सर्वांना उपयोगी पडत नाही. त्यामुळे त्यांना आवश्‍यक असणाऱ्या वस्तू किंवा तंत्रज्ञान देखील अनेक प्रकारांत उपलब्ध करून द्यावे लागते. पालक आणि शिक्षकांची ही अडचण लक्षात घेत टेक्टोपस या स्टार्टअपने विविध उत्पादने विकसित केली आहेत. 
दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक घरांत या मुलांचा सांभाळ व त्याला शिक्षित करण्याची जबाबदारी आईकडेच असते. तसेच, त्यांच्या शाळेत देखील महिलांची संख्या जास्त असते. स्टार्टअपने तयार केलेली उत्पादने या सर्व महिलांसाठी त्यांचे रोजचे काम सोपे करणारी ठरली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे, शाळा आणि सरकारी यंत्रणा देखील त्यांची उत्पादने घेत आहेत. एप्रिल २०१८मध्ये या स्टार्टअपची स्थापना झाली. सलोनी मेहता आणि केरन डिमेलो या स्टार्टअपच्या संस्थापक आहेत.

वर्कशीट, पुस्तकांशिवाय ॲपदेखील 
कोरोनानंतर शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत आहेत. ऑनलाइन शिक्षणपद्धती सर्वच विद्यार्थ्यांना रुचणारी व समजणारी नसल्याचे काही प्रकारांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिव्यांग मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार या स्टार्टअपने घेतला आहे. मोबाईल ॲप, ऑनलाइन वर्कशीट गेममुळे या मुलांना शिक्षण घेणे अधिक आवडीचे व सोईस्कर झाले आहे. त्यासह पुस्तके आणि इतर उत्पादने या स्टार्टअपने उपलब्ध करून दिली आहेत.

घरात कोणी दिव्यांग असल्यास आईला त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. काही ठिकाणी त्यांच्या बहिणींनादेखील या मुलांची काळजी घ्यावी लागत असल्याने त्यांना शाळेत जाणे शक्‍य होत नाही. मुळात दिव्यांग मुले ही समस्या नाही. आपण कोणी दिव्यांग असू शकतो, हे मान्यच करीत नाही. कोणात क्षमता नाही, हीच त्याची अक्षमता ठरवली जाते. मात्र, अक्षमतेची कोणतीही व्याख्या नाही, त्यामुळे दिव्यांगांविषयी असलेले नकारात्मक विचार मनातून काढून टाकले पाहिजेत. 
- सलोनी मेहता, सहसंस्थापक, टेक्‍टोपस 

(शब्दांकन : सनील गाडेकर)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Easy to educate disabled children