धक्कादायक! 'पद्मश्री' विजेत्यावर आली मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- ओडिशातील आदिवासी शेतकऱ्याला येत आहेत अडचणी.

- कोणीही देत नाहीये रोजगार.

नवी दिल्ली : ओडिशातील क्‍योंझर तालुक्यातील दियातारी नायक या शेतकऱ्याला नागरी पुरस्कार 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले. मात्र, त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांना कोणीही काम देण्यास तयार नाही. परिणामी सध्या त्यांच्यावर मुंग्यांची अंडी खाण्याची वेळ आली आहे.  

तालाबायीताराणी गावातील रहिवाशी असणाऱ्या नायक यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, या पुरस्कारामुळे त्यांच्यासमोर आता रोजागाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी शेतकऱ्याला इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना आता कोणीही काम देण्यास तयार नाही. तसेच नायक यांच्या प्रतिष्ठेला रोजंदारीची कामं शोभत नाहीत, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. रोजगार नसल्याने त्यांना जीवन कसे व्यतित करायचे हा प्रश्न भेडसावत आहे. त्यांचा जगण्याचा हा लढा ते मुंग्यांची अंडी खाऊन लढत आहेत. 

दरम्यान, पद्मश्री विजेत्याला अशाप्रकारचे जगणे जगावे लागत असल्याने सगळीकडे याचीच चर्चा होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eating ant eggs for survival says jobless farmer and Padma Shri awardee