बादल यांचे भाषण प्रसारित केल्याबद्दल दूरदर्शनला नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

चंदिगढ : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंजाबच्या राज्यपालांचा कार्यक्रम प्रसारित न करता मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस पाठविली आहे.

चंदिगढ : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंजाबच्या राज्यपालांचा कार्यक्रम प्रसारित न करता मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस पाठविली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बादल हे मोहाली येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. दूदर्शनने राज्यपाल उपस्थित असलेला कार्यक्रम प्रसारित न करता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे प्रसारण केले. निवडणूक असलेल्या राज्यातील राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांच्या प्रसारणाबाबत कडक नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पंजाबमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमाचे प्रसारण न करता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे प्रसारण कसे केले याबाबत निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. दूरदर्शनद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येते. तर स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

राज्यपालांच्या कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी न देता मुख्यमंत्र्यांच्या  कार्यक्रमाचे प्रसारण केल्याबाबत निवडणूक आयोगाने दूरदर्शनच्या महासंचालकांकडे लेखी पत्राद्वारे विचारणा केली असून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

Web Title: EC notice to Doordarshan for showing Pubjab CM programme