'आप'च्या 27 आमदारांना नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, लाभाचे पद भूषविल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने 27 आमदारांना नोटीस बजावली आहे.

काही दिवसांपूर्वी या आमदारांचे सदस्यत्व रद्द केले जावे, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. जून महिन्यामध्ये ही याचिका सादर झाल्यानंतर राष्ट्रपती भवनाने ती निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. आयोगाच्या या नोटिशीस संबंधित आमदारांना 11 नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागेल.

Web Title: EC sends notice to 27 AAP MLAs