'पंतप्रधानांच्या घोषणा संपल्यानंतर गुजरात निवडणुका'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील घोषणा संपल्यानंतरच निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल. सध्या निवडणूक आयोग सुट्टीवर आहे. निवडणूक आयोगाने मोदींना मुभा दिली असून, त्यांनी गुजरातमध्ये सभा घेऊन नव्या घोषणा कराव्यात. त्यानंतर आयोगाला माहिती द्यावी.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटले आहे, की जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व घोषणा करत नाहीत, तोपर्यंत गुजरात निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होत नाही.

यापूर्वीही काँग्रेसने निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या कार्यक्रमावरून लक्ष्य केले होते. निवडणूक आयोगाने आतापर्यंत फक्त हिमाचल प्रदेशातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. गुजरातमधील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींच्या गुजरात दौऱ्यावेळी जुमल्यांचा पाऊस पडणार असे ट्विट केले होते. 

आता चिदंबरम यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील घोषणा संपल्यानंतरच निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल. सध्या निवडणूक आयोग सुट्टीवर आहे. निवडणूक आयोगाने मोदींना मुभा दिली असून, त्यांनी गुजरातमध्ये सभा घेऊन नव्या घोषणा कराव्यात. त्यानंतर आयोगाला माहिती द्यावी.

Web Title: EC is waiting for Modi to announce date of Gujarat polls, says Chidambaram