राजकीय पक्षांना 2 हजारांवरील देणगीवर बंदी घाला

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तींकडून देणाऱ्या देणगीची संविधानिकरित्या कोठेही नोंद होत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या देणगीची मर्यादा ही दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली - निवडणुकांमध्ये काळा पैश्याच्या वापरावर नियंत्रण येण्यासाठी राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.

राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तींकडून देणाऱ्या देणगीची संविधानिकरित्या कोठेही नोंद होत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना अज्ञात व्यक्तीकडून देण्यात येणाऱ्या देणगीची मर्यादा ही दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सध्या राजकीय पक्षांत 20 हजारांपर्यंत जुन्या नोटा भरणारे पैसे हे करमुक्त आहेत. 20 हजारांपेक्षा अधिक रकमेबाबत कागदपत्रे द्यावी लागतात.

निवडणूक आयोगाने देणगीबाबतचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणूकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होत असल्याच्या संशयावरून निवडणूक आयोगाने ही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: EC Wants Ban on Anonymous Donations to Political Parties Beyond Rs 1,999