Election Commission : निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत; स्थलांतरीतही करू शकणार मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission

Election Commission : निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत; स्थलांतरीतही करू शकणार मतदान

नवी दिल्ली - भारतातील जवळजवळ एक तृतीयांश प्रौढ जनता मतदान करत नाही, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना नव्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) डेमोसाठी बोलावले आहे. या मशिनमुळे देशातील स्थलांतरितांना त्यांच्या घरापासून दूर असताना देखील मतदान करण्यास मदत होणार आहे. शिवाय मतदान करण्यासाठी वृद्धांचा प्रवास टळणार आहे. (Election Commission news in Marathi)

हेही वाचा: Cough Syrup: कफ सिरप पिल्याने १८ लहानग्यांचा मृत्यू; भारताला धरले जबाबदार

निवडणूक आयोगाकडून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (आरव्हीएम) तयार करण्यात आले असून, त्यामुळे ७२ मतदारसंघांची मते स्वीकारता येतील. मतदारानुसार हे यंत्र स्विच केले जाते. यामुळे दुर्गम मतदान केंद्रावरून आरव्हीएमच्या माध्यमातून ७२ मतदारसंघांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

"2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4% मतदान झाले होते. अर्थात 30 कोटींहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. यावरून निवडणूक आयोग चिंतीत आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Sharad Pawar: शरद पवारांचे PM मोदींना पत्र; काय आहे कारण?

दरम्यान आरव्हीएम मशीनचा डेमो १६ जानेवारीला आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित राहणार आहे. याशिवाय कायद्यात आवश्यक बदल, प्रशासकीय कार्यपद्धती आणि मतदान पद्धती किंवा तंत्र अशा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित मुद्द्यांवर आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.

टॅग्स :VotingEVM