
ED Chargesheet on AAP: 'आप'नं हवालामार्गे पैसे घेतले, गोव्याच्या निवडणुकीत...; EDच्या चार्जशीटमध्ये दावा
नवी दिल्ली : दिल्लीच्या कथीत मद्य घोटाळ्यात ईडीनं चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीनं हवालामार्गे पैसा घेतला, तसेच या पैशाचा वापर गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत वापरला असा धक्कादायक दावा या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. (ED Chargesheet on AAP Party took money through hawala network money used in Goa elections)
ईडीनं आरोप केला आहे की, चौकशीत हे समोर आलं आहे की, शेरिएट प्रॉडक्शन मीडियात प्रा. लि. कंपनीचे मालक राजेश जोशी आणि अनेक लोक संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहभागी होते. या कंपनीमार्फत केवळ बँकेकडूनच नव्हे तर हवाला नेटवर्कच्या माध्यमातून रोख पैसेही मिळाले आहेत. तसेच या पैशांचा वापर गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी करण्यात आला.
या चार्जशीटमध्ये असंही म्हटलंय की, या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास गेल्यावर्षीच सुरु झाला होता. या चौकशीत हे दिसून आलं की, ३० कोटी रुपये हवाला नेटवर्कच्या मार्फत ट्रान्सफर करण्यात आले होते. गोवा निवडणुकीच्या काळात हे पैसे निवडणूक कँम्पेनसाठी व्हेंडर्सना देण्यात आले. बँकिंग आणि कॅश अशा दोन्ही स्वरुपात हे पैसे देण्यात आले.